महाराष्ट्र 9

अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार

[espro-slider id=13780]

अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार

जळगाव : गुटखा, पान मसाला,सुगंधित तंबाखु, सुपारी, खर्रा व मावा या प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या बंदीची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आता अधिकार देण्यात आले असून अन्न व औषध विभागाची परवानगी घेण्याची गरज नाही. पोलीस थेट गुन्हा नोंदवू शकतात, याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी काढले


प्रत्येक पोलीस अधीक्षक व आयुक्तांना त्याची प्रत पाठविण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी पोलीस दलाला विनंती केली असून अन्न सुरक्षा अधिकारी यांचा प्रतिबंधीत अन्न पदार्थ प्रकरणी दिलेला भादवि कलम १८८, २७२,२७३ व ३२८ अंतर्गत प्रथम खबरी अहवाल दाखल करुन घेण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत. यापूर्वी ५ फेबुरवारी २०२० रोजी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ पोलिसांना स्वतंत्र कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना आता अन्न व औषध प्रशासन विभागाला सोबत न घेताही कारवाई करता येणार आहे. दरम्यान, अन्न व औषध विभागाने कारवाई करावयची झाल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी केली तर पोलिसांना बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस
महानिरीक्षक मिलिंद भारंबे /कायदा व सव्यवस्था) यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी झालेले आहेत. एफडीएचा ताण कमी होणार
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नेहमीच मनुष्यबळाच्या नावाखाली कारवाया कमी होत असल्याचे सांगितले जात होते, आता थेट पोलिसांनाच अधिकार प्राप्त झाल्याने या विभागाचा ताण कमी झाला आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]