महाराष्ट्र 9

पाचोरा येथील क्वारंटाईन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येची चौकशी ची नागरिकांची मागणी

[espro-slider id=13780]

पाचोरा – येथे क्वारंटाईन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येची चौकशी ची नागरिकांची मागणी !
पाचोरा – पाचोर्‍यातील जामनेर रोड वरील साई मोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये दिनांक २० रोजी रात्री उशिरा राणीचे बांबरुड तालुका पाचोरा येथील एका ३३ वर्षे युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याने तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे हा युवक दिनांक १९ जुलै रोजी या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला होता यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी दी. २० रोजी घेण्यात आले होते अद्याप त्याचा अहवाल येणे बाकी आहे . त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही दरम्यान घटनास्थळी २१ रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील , तहसीलदार कैलास सावळे , पोलीस निरीक्षक अनिल शिंदे , डॉक्टर अमित साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली . सदर युवकावर शासकीय नियमाप्रमाणे प्रोटोकॉल पाळत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत युवकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळाले नसून सदरील युगाच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]