चोपडा महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम
इयत्ता१२वी वर्गाचा ९४.९१%निकाल
चोपडा.

चोपडा (प्रतिनिधी):-महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय,चोपडा येथील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत सरासरी ९४.९१%एवढी मजल मारली आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९७.७१%लागला असून रायसिंग कुणाल रातीलाल याने ८९.८४%गुण प्राप्त करत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तर माळी जान्हवी किशोर ८८.९२%मिळवत दुसरे स्थान पटकविले.जडे वैष्णवी राजेंद्र ८८.३०%प्राप्त केल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वाणिज्य शाखेचानिकाल ९८.३२% लागला असून अग्रवाल खुशी हरिश्चंद्र ९२.६१,जैन अंजली धिरेंद्र कुमार ९१.३८%,पाटील क्रांती मनोहर ९०.३०%अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
कला शाखेनेही ८६.००%पर्यंत मजल मारत गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला आहे.
लोहार गौरव भाऊसाहेब८१.८४%,पांचाळ मनेश संतोष ७८.७६%,कुमावत भाग्यश्री नितीन ७७.०७%गुण मिळवत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत.
सर्व यशवंत विद्यार्थी, पालक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष-अँड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष-सौ.आशा विजय पाटील,सचिव-डॉ.स्मिता संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,रजिस्टार डी.एम.पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी. पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे,उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,आदींनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.