महाराष्ट्र 9

प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील कला,शास्त्र,वाणिज्य,व्यवसाय शिक्षण निकालात मुलींचीच बाजी

[espro-slider id=13780]

प्रताप विद्या मंदिराच्या
उच्च माध्यमिक विभागातील कला,शास्त्र,वाणिज्य,
व्यवसाय शिक्षण निकालात मुलींचीच बाजी

प्रतिनिधी: येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील कला, शास्त्र, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण आदी सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले आहे. या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील कला शाखेचा निकाल एकूण 80.87 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 96.5 टक्के, शास्त्र शाखेचा निकाल 100 टक्के तर व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल 84 टक्के लागला आहे.


चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री व्ही सी गुजराथी, चेअरमन श्री राजाभाई मयुर, उपाध्यक्ष श्री मोरेश्वर देसाई, सचिव माननीय माधुरीताई मयूर,श्री चांद्रहासभाई गुजराथी, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक श्री डी व्ही याज्ञीक, उपमुख्याध्यापक श्री आर आर शिंदे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री जे एस शेलार, संस्थेचे समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी, पर्यवेक्षक श्री जी वाय वाणी, श्री आर बी पाटील, विविध विद्याशाखांचे पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

विभागवार यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
■कला विभाग■
प्रथम क्रमांक
भिल चंद्रकला प्रल्हाद (82.77%)
द्वितीय: पाटील कल्याणी सत्यसिंग (79.85%)
■ वाणिज्य विभाग ■
प्रथम क्रमांक चौधरी मयूरी बाबूलाल(79.69)
द्वितीय क्रमांक पाटील लक्ष्मी रविंद्र(79.23)
■शास्त्र विभाग■
प्रथम क्रमांक चौधरी वैष्णवी संजीव(82.31)
द्वितीय क्रमांक साळी दर्शना गोपाल(80.77)
■ व्यवसाय शिक्षण विभाग ■
प्रथम क्रमांक सोनार मंगेश प्रमोद(69.38)
द्वितीय क्रमांक मोरे विशाल प्रकाश(64.15)

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]