चोपडा तालुक्यात आज 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@451
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.13रोजी रात्री उशिरा प्राप्त 90पैकी 66 निगेटिव्ह 24 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील अरुण नगर भागातील 18 जणांचा समावेश आहे तर अडावद येथील सहा जण कोरोना बाधित आढळले आहे. तसेच पंचक येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यात दोन महिला व तीन पुरुष आहे. खाजगी रिपोर्ट ची संख्या वरील दिलेल्या संख्येत समाविष्ट नाही चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 451झाली आहे त्यापैकी 271 रुग्ण बरे झाले 24 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .