चोपडा नगरपरिषदेची स्थायी समितीची Video Conferencing द्वारे (Online) सभा घेणारी महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद
चोपडा(प्रतिनिधी):- चोपडा नगरपरिषदेची म. स्थायी समिती सभा वार- सोमवार, दि.06 रोजी दुपारी 4:00 वाजता ही Video Conferencing (Online) व्दारे घेणेत आली. विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात Video Conferencing (Online) व्दारे सभा घेणारी नगरपरिषद म्हणून चोपडा नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली असुन ही ऐतिहासिक बाब आहे. तसेच ही सभा म. पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष म्हणून चोपडा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो., मनिषाताई जिवन चौधरी यांचे अध्यक्षते खाली घेणेत आली. तथापि, सदरील सभेसाठी एकूण 9 सदस्यांनी सहभाग नोंदविला. उक्त सभा घेणे अगोदर सकाळी 11:00 वाजता सर्व सन्माननीय सदस्य यांना प्रात्यक्षिक देणेत आले. तसेच सदरील प्रात्यक्षिकामध्ये सर्व सदस्यांचे ऑनलाईन सभे विषयीचे सर्व शंका अडचणी यांचे मुख्याधिकारी यांचे तर्फे निरसन करणेत आले. तद्नंतर दुपारी 4:00 वाजता सदरील सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण 29 विषय होते. सभेची विषय पत्रिका आधिच सर्व सदस्यांना निर्गमित करणेत आलेली होती व सर्व विषयां संदर्भात सदस्यांकडून सूचित केलेल्या विहीत वेळेत सूचना / उपसूचना प्राप्त झाल्या होत्या. तसेच सभा सुरु असतांना प्रत्येक विषयनिहाय विषयाचे वाचन करणेत आले, प्रत्येक विषय निहाय प्रस्तावाची पार्श्वभूमी स्पष्ट करणेत आली. त्यानंतर सदस्यांकडून प्राप्त विषया संबंधी सूचनेचे वाचन करणेत आले. त्यानंतर अनुक्रमे प्रत्येक विषयाचे सूचनेवर मतदान घेण्यात आले. सदरील सदस्यांना मतदानाची नोंद करणे कामी 5 मि. ची वेळ देणेत आलेली होती. तथापि, सर्व विषयांसाठी सर्व सदस्यांनी विहीत वेळेत अगदी उस्फुर्तपणे मतदान केले. तसेच सदरील म. स्थायी समिती सभेचे मतदान अनुकूल, प्रतिकुल तसेच तटस्थ या स्वरुपात ऑनलाईनच घेणेत येवून त्याची नोंद PDF स्वरुपात जतन करणेत आली ही बाब या सभेचे वैशिष्ट विशद करणारी असुन वेगळेपण दर्शविणारी आहे. या सर्व अनुषंगिक गोष्टींमुळे सदरील सभा ही इतिहासात आठवणीत असणारी ठरणार आहे. त्यानुसार सर्व 29 विषयांपैकी काही विषयांना सर्वानुमते तर काहींना बहुमताने मंजुरी देणेत आली व सभेच्या अंती मुख्याधिकारी व सर्व सदस्य यांनी त्यांचे या ऐतिहासिक Video Conferencing (Online) व्दारे झालेल्या सभे विषयीचे आपआपले सकारात्मक अभिप्राय मांडले. तसेच संपूर्ण सभा ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विनाअडथळा पार पडली

. सदर सभेस उपनगराध्यक्ष श्री. भूपेंद्र गुजराथी, गटनेते श्री. जीवनभाऊ चौधरी, सदस्य श्री. हितेंद्र देशमुख(राजुभाऊ), सौ. सुरेखा माळी, सौ. सीमा श्रावगी, श्री. रमेश शिंदे, श्री. अशोक बाविस्कर, श्री. किशोर चौधरी तसेच मुख्याधिकारी श्री. अविनाश गांगोडे, उपमुख्याधिकारी कु. पूनम राणे, सभा अधिक्षक श्री. निलेश ठाकूर, कार्यालय अधिक्षक श्री. रविंद्र जाधव, बांधकाम अभियंता श्री. सचिन गवांदे, स्वच्छता निरिक्षक श्री. व्ही. के. पाटील, संगणक अभियंता श्री. रोहीत सुरसे, पाणी पुरवठा अभियंता कु. पल्लवी घिंवदे, भांडारपाल श्री. भिकन पारधी, करनिरिक्षक श्री. रमेश बहिरम, विद्युत अभिंयता मंगेश जंगले, लेखापाल श्री. संतोष पुणेकर, शहर समन्वयक एन.यु.एल.एम श्री. गणेश पाठक आदी उपस्थित होते. तसेच सायंकाळी 6:00 वा. म.पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष यांनी सर्व सदस्यांचे आभार माणून सभा संपलेचे जाहिर केले.
