महाराष्ट्र 9

चोपड्यातील कापड व्यवसायकाची दोन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक.अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी):- सद्या बँका आणि विविध प्रसार माध्यमातून सूचित केले जात असताना पण ओटीपी शेअर करू नका सूचना नागरिकांना दिल्या जातात तरी सुज्ञ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत असते असाच एक प्रकार चोपडा शारातील कापड व्यवसायिक सोबत घडला व अज्ञात भामट्याने ऑनलाईन दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे .
पेटीएम केवायसी करवाना है तो इसिलिए आप अपने एटीएम कार्ड नंबर की जानकारी दो असे हिंदीतून बोलणाऱ्या एका अज्ञात भामट्याने मोबाईल वरून शहरातील एका रेडिमेट कापड दुकानदाराला सांगितले त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपला एटीएम नंबर दिला त्यानंतर हिंदी बोलणाऱ्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये अप्लिकेशन डाऊनलोड करके पासवर्ड नंबर और मोबाईल नंबर लॉगिन करके अलॉव करो असे पुन्हा सांगितले त्याप्रमाणे व्यापाऱ्याने आपल्या मोबाईल मध्येअलॉव केले असता बँक खात्यातून तीनदा ट्रॉझिक्शन करण्यात येऊन व्यापारी बँक खात्यातून ऑनलाईन परस्पर दोन लाख रुपये काढण्यात आल्याची घटना रविवारी घडली.

या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील रमेश हणुतमल  जैन (वय-६०) यांचे गुजरअळी भागात मेनरोडवर राहुल कलेक्शन नावाचे रेडिमेड कापड दुकान आहे. दरम्यान ७ रोजी रविवारी दुपारी ४ वाजता रमेश जैन व त्यांचा मुलगा राहुल जैन असे दोन्ही दुकानात बसलेले असतांना त्यांच्या मोबाईलवर९१८१०९६६४३२ या अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. यावेळी हिंदी भाषेत बोलणाऱ्या आपका पेटीएम केवायसी करवाना है तो इसिलिए आप अपने एटीएम कार्ड नंबर की जानकारी दो ! असे एका अज्ञात भामट्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रमेश जैन यांनी आपला एटीएम नंबर दिला त्यानंतर त्याने पुन्हा अँड्रॉईड मोबाईल मध्ये टीमव्हीवर क्लिक सपोर्टअप्लिकेशन डाऊनलोड करके और आपका मोबाईल नंबर लॉगीन करो उसके बाद अलॉव करो असे सांगितले .त्या प्रमाणे रमेश हनुतमल जैन यांनी – आप मोबाईल मध्ये अलॉ व  केले अस हिंदी बोलणार्याने पुन्हा एटीएम कार्ड चा पासवर्ड मागितला परंतु माझ्या लक्षात नाही असे रमेश जैन यांनी सांगताच त्याने मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर मागितला असता तो त्याला तोंडी सांगितले पुन्हा त्याने अलॉव करो असे सांगितल्याने तसे करताच रमेश हनुतमलजैन यांच्या आयसीआय बँकेच्या अकाउंट नंबर १४८३०५००६६१५ मधून ९९,९९०/- रुपये ऑनलाईन परस्पर वर्ग झाले त्यानंतर रमेश जैन यांनी त्या अज्ञात हिंदी बोलणाऱ्याला माझे पैसे खात्यातून कमी झाल्याचे सांगितले यावर त्याने आपले पैसे वापस आ जायेंगे असे सांगून पुन्हा अलॉव करो असे सांगितले त्यानुसार त्यांनी मोबाईलवर अलॉव केले त्यानंतर मुलगा राहुल जैन याने देखील पुन्हा अलॉव करताच व्यापारी रमेश जैन यांच्या आयसीआय बँक अकाऊंट मधून तिसऱ्यांदा ऑनलाईन ट्रांजेक्शन करून एक लाख रुपये काढण्यात आले. असे एकूण १,९९,९९०/ रुपये हिंदीत बोलणारे अज्ञात भामट्याने परस्पर काढून फसवणूक केल्याचे लक्षात येताच रमेश जैन व त्यांचा मुलगा राहुल जैन यांनी अनोळखी मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु होऊ शकला नाही. या प्रकरणी रेडिमेड कापड दुकानदार रमेश हनुतमल जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात हिंदी बोलणाऱ्या भामट्या विरुद्ध भादवि कलम ४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६,६६ (सी),६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांनी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]