चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थी धिरुभाई अंबानी शिष्यवृत्तीचा मानकरी

चोपडा(प्रतिनिधी):- चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत कला, शास्त्र आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०१८-१९ मधील इयत्ता १२ वी विज्ञान वर्गातील नरेंद्र राजू पाटील यास फेब्रुवारी-मार्च २०१९ एच.एस.सी. परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे रिलायन्स फाऊंडेशन तर्फे दिली जाणारी धिरुभाई अंबानी शिष्यवृत्ती मिळाली आहे. नरेंद्र सध्या सुरतकल , (कर्नाटक) येथे एन.आय.टी.चे शिक्षण घेत आहे.नरेंद्र च्या यशाबद्दल त्याच्या पालकांसह त्याचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अॕड संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशा विजय पाटील, सचिव डाॕ.स्मिता संदीप पाटील,प्राचार्य डाॕ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा.डाॕ.ए.एल.चौधरी,डाॕ.व्ही.टी.पाटील,डाॕ.के.एन.सोनवणे,प्रा.एन.एस.कोल्हे,प्रा.बी.एस.हळपे,पर्यवेक्षकप्रा.व्ही.वाय.पाटील,रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदींसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीअभिनंदन केले आहे.