महाराष्ट्र 9

प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; शुभेच्छा कार्यक्रम रद्द; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण

[espro-slider id=13780]

प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; शुभेच्छा कार्यक्रम रद्द; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण


चोपडा – राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून वर्धापन दिवस तर ११ जून रोजी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांचा वाढदिवस असतो. हा योग साधत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम अायोजीत करण्यात अाहेत. परंतु वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता वर्डी येथे प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिर, दि. १० रोजी सकाळी १०.१० वाजता गो.भि.जिंनीग फॅक्टरीत ध्वजारोहण, दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात रक्तदान शिबिर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे गंलगी येथे भुमिपुजन, अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्षारोपण, अार्सनीक अल्बम – ३० होमियोपॅथी औषधीच्या १० हजार बाटल्यांचे वाटप, १० हजार मास्क व १० हजार साबणाचे वाटप, लहान मुलांना मिठाई वाटप असे सामाजिक उपक्रम घेण्यात अालेले अाहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत रक्तदान करावे व कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे
@शुभेच्छा कार्यक्रम रद्द@
प्रति वर्षाप्रमाणे अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ जून रोजी शुभेच्छासाठी त्यांचे निवासस्थानी न जाता फोनवरून, समाज माध्यमांवर शुभेच्छा द्याव्यात. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता प्रा. गुजराथी यांच्या निवासस्थानी गर्दी न करण्याची विनंती राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अरुणभाई मित्र मंडळातर्फे करण्यात आली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]