महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील आदिवासी महिलेचा नसबंदीचा ऑपरेशन नंतर मृत्यू # डॉक्टरांचा निष्काळजी पणा मुळे मृत्यू झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी  चोपडा शहर पोलिस ठाण्यात दिली ..

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील आदिवासी महिलेचा नसबंदीचा ऑपरेशन नंतर मृत्यू # डॉक्टरांचा निष्काळजी पणा मुळे मृत्यू झाला असल्याची तक्रार नातेवाईकांनी  चोपडा शहर पोलिस ठाण्यात दिली ..

चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  बु. येथे ता. १८. रोजी नसबंदी शस्त्रक्रिया करणेकामी गेलेली होती. त्या दिवशी तिचे मेडिकल चेकअप होवून डॉक्टर रमेश धापे व डॉ. मयुरेश माने यांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि. १९.रोजी अॅडमीट करुन घेतले व तिच्यावर शस्त्रक्रिया केली, शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची लागलीच प्रकृती अतिशय गंभीर झाली व तिला शस्त्रक्रिया झालेल्या जागी रक्तस्त्राव होवू लागला त्यामुळे तिला तात्काळ चोपडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, वोपडा येथे दाखल करण्यात आले त्यावेळी तिचा शस्त्रक्रिया झालेल्या जागेतुन रक्तस्त्राव होणे बंद होत नव्हते म्हणुन तेथील डॉक्टरांच्या सूचने नुसार माझ्या पत्नीला जळगाव येथील शासकीय जिल्ला रुग्णालय, जळगाव येथे अॅम्बुलेन्स मध्ये घेः जातांना ही माझ्या पत्नीची तब्येत अतिशय गंभीर होती. त्यानंतर तिला जिल्हा रुाणालय, जळगाव मध्ये दाखल केले व तिच्यावर उपचार सुरु असतांना शस्त्रक्रिया झालेल्या जागेतून रक्तस्त्राव होत होता त्यावेळी तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर परत टाके मारले तरी देखील शस्त्रक्रिया

झालेल्या जागेवर रक्तस्त्राव बंद होत नव्हता व त्यानंतर तिचे पोट फुगू लागले व काही वेळा नंतर तिच्या नाकातुन व तोंडातून रक्तस्त्राव होणे सुरु झाले व ते बंद होत नव्हते व त्यामुळे अशातच तिचा मृत्यू झाला. हे सर्व काही डॉ. रमेश धापे, शस्तक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, गोरगावले बु. तसेच डॉ. मयुरेश माने प्रमुख वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, गोरगावले बु. व त्यांचे सहकारी यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथील डॉक्टर तसेच कर्मचारीवृंद व जळगांव शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा मुळेच माझी पत्नी  बसंती गुड्डया पावरा हिची मृत्यू झाला आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी तक्रार चोपडा शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे .

चोपडा वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर यांच्याशी माहिती घेतली असता  अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे तालुक्यात हजारो नसबंदीशस्त्रक्रिया झाल्या आहे पण मृत्यू कोणाचा झाला नव्हता या बाबत जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती लासूरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]