महाराष्ट्र 9

वेळोदे घोडगाव गलंगी परिसरात वादळी वाऱ्यानेझाडे कोलमडली

[espro-slider id=13780]

वेळोदे घोडगाव गलंगी परिसरात वादळी वाऱ्याने
झाडे कोलमडली


चोपडा ( वार्ताहर ) – तालुक्यातील पश्चिम भागाला काल दि.६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसाने चांगलेच झोडपले.सुमारे एक तासाच्या वर झालेल्या वादळी वाऱ्याने घोडगाव, गलंगी,वेळोदे परिसरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले तर रस्त्यांवर मोठाली झाडं कोलमडून पडली होती.

वादळी वाऱ्याने भर रस्त्यांवर झाडं पडल्याने रहदारीस अडथळा होत गाड्यांच्या रांगा लागल्या असतांना घोडगाव येथील नवनिर्वाचित उपसरपंच किशोर दुसाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.२४ तास उलटूनही रस्त्यातली झाडे न उचलल्यामुळे किशोर दुसाने यांनी मित्र भैय्यासाहेब जेसीबी वाले यांना विनंती करून जेसीबी मशीन मागवून रस्त्यातील अडथळे बाजूला केले.तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी भ्रमणध्वरीद्वारे संपर्क करून पश्चिम परिसरात झालेल्या केळीच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावे यासाठी विनंती केली तहसीलदार थोरात यांनी मंडळ अधिकारी माळी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]