महाराष्ट्र 9

अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट संपर्क कार्यालयाचे चोपडा येथे थाटात उद्घाटन

[espro-slider id=13780]

अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट संपर्क कार्यालयाचे चोपडा येथे थाटात उद्घाटन
चोपडा ( वार्ताहर ) – अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट ( शिरपूर ) या नामांकित शिक्षण संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चोपडा येथील देशमुख संकुल येथे कार्यलय प्रमुख रुपेश भालेराव यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था शिक्षणासोबतच बेरोजगार,अल्पशिक्षित तरुणांना बाहेर देशात नौकरीची संधी आणि हमी देत असते.

संस्थेचे अध्यक्ष अविनाश पाटील,के.पी.विनोद यांनी अनेक वर्ष परदेशात राहून तेथील कंपन्यांशी सुसंवाद साधत भारतातील विशेषतः खान्देशातील
तरुणांसाठी रोजगार आणि नौकरीची संधी उपलब्ध करून देत आहेत.शिरपूर येथील अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये बोल्ट टॉल्क टेक्निशियन, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन,कॉलम टेक्निशियन,मेकॅनिकल टेक्निशियन,रोटरी टेक्निशियन,रिगर,मेकॅनिकल फिटर,पाईप फॅब्रिकेटर,स्काप फोल्डर असे कोर्सेस असून किमान ४५ दिवसांच्या शिक्षणानंतर परदेशातील दुबई,ओमान,आबुदाबी,अरब देशात नौकरीची हमी व्हिसा,राहणे,खाणे,वैद्यकीय सेवा,पुन्हा चांगला आकर्षक पगार अशी विविध रोजगाराची दालन ही संस्था उपलब्ध करून देत आहे.शिक्षणाची फार मोठी अट नाही १० वी,१२ वी पास नापास विद्यार्थ्यांना सुध्दा रोजगार मिळवून देण्याची बांधलकी जपणारी अँडव्हान्स टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेचे संपर्क कार्यालय चोपडा येथील देशमुख संकुलात सुरू झाले असून रोजगारासाठी,शिक्षणासाठी संपर्क करण्याचे आवाहन कार्यालय प्रमुख रुपेश भालेराव यांनी केले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]