चोपडा शहरात अज्ञात चोरट्यांचा ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न # सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील समर्थ ज्वेलरी शॉप व अंकिता ज्वेलर्स या दुकानाचे शटर चे लॉक तोडण्याच्या प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आले .

या बाबद सविस्तर वृत् असे की चोपडा दि.१४ रोजी पहाटे २:१० मिनिटे ते २:४० मिनिटाचा कालावधीत शहरातील मुख्य बाजारपेठेतील समर्थ ज्वेलर्स व अंकिता ज्वेलर्स हे सामोरा समोर असलेले ज्वेलरी शॉपचे अज्ञातंकडून दुकानाचे लॉक तोडण्याच्या प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती दुकानाचे मालक हितेश जैन यांनी दिली चोपडा पोलिसाना माहिती मिळताच पोलिसांनी दुकान व दुकानाचा परिसरातील सी सी टीव्ही तपासणी केली असता तीन अज्ञात चोरटे समर्थ ज्वेलरी शॉप चे शटर उघडण्याचे प्रयत्न करत असतानाचे दिसून आले सदर घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्या सी सी फुटेज चा आधारे चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे पुढील तपास करत आहे सराफा बाजारात अशी घटना घडल्यामुळे सराफा व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

