महाराष्ट्र 9

महिला मंडळ शाळेचा निकाल शंभर टक्के; मुलींनीच मारली बाजी

[espro-slider id=13780]

महिला मंडळ शाळेचा निकाल शंभर टक्के; मुलींनीच मारली बाजी


चोपडा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून शाळेने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही प्रथम पाच क्रमांकांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.


विद्यालयातून प्रथम येण्याचा मान वैष्णवी दीपक माळी या विद्यार्थिनीने मिळवला असून तिला ९५.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तर द्वितीय क्रमांक साक्षी प्रमोद बोरसे (९३.८०) व तृतीय क्रमांक कोमल विजय पाटील (८९.८०) यांनी प्राप्त केला. विद्यालयातील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील व सहकारीवृंदाने अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]