महाराष्ट्र 9

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

चोपडा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लग्नसमारंभात झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका निवृत्त पीएसआय बापाने आपल्या मुलीवर भर लग्नात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या ठिकाणी घडली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नात वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्याला ही गंभीर जखमी केले आहे त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

प्रेम विवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे. सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता.
विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं. अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघंही शनिवारी चोपडा शहरात आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या.गोळीबारात तृप्ती वाघचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वाघ हा गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]