राज्य टी.डी.एफ.चे पालघर येथे अधिवेशन # टी.डी.एफ. च्या वतीने जळगांव जिल्ह्यातुन एच जी इंगळे यांना जीवन गौरव तर मंगेश भोईटे (चोपडा)वराजेंद्र शिंदे (एरंडोल) यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दि दिनांक-26 एप्रिल 2025 रोजी शिक्षण महर्षी स.तु.कदम विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय, पालघर सकाळी-8.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
सदरील अधिवेशन दोन सत्रात होणार असून यात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली, चौकशी समितीचे वास्तव व उपाय यावर शोधनिबंधाचे सादरीकरण, विविध पुरस्कारांचे वितरण नंतर खुले अधिवेशन अशी रूपरेषा असून या अधिवेशनात शिक्षण क्षेत्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असून जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे, 15 मार्च 2025 संचमान्यता शासन आदेशातील निकषावर फेरविचार करणे, ऑनलाईन कामे कमी करणे, नवीन शैक्षणिक धोरण, सीबीएसई अभ्यासक्रम, शिक्षक-शिपाई भरती बंदी व समस्या राज्याच्या वरिष्ठासमोर मांडण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.तरी सदरील अधिवेशनास जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थितीचे आवाहन राज्य टी.डी.एफ. चे उपाध्यक्ष आर एच बाविस्कर,कोशाध्यक्ष निशांत रंधे,राज्य पदाधिकारी डॉ एन डी नांद्रे,नाशिक विभाग टीडीएफ चे अध्यक्ष संजय पवार सर,यांनी केले आहे.
यावेळी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही

आघाडी,टीडीएफ च्या वतीने जळगांव जिल्ह्यातुन एच जी इंगळे यांना जीवन गौरव तर मंगेश भोईटे (चोपडा)व राजेंद्र शिंदे (एरंडोल) यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत
सदरील पुरस्कार दिनांक-26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ च्या राज्यस्तरीय अधिवेशनात उदघाटक एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र टीडीएफ चे राज्याध्यक्ष जी के थोरात, दादाजी भुसे साहेब (शालेय शिक्षणमंत्री-महाराष्ट्र राज्य), गणेशजी नाईक (वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर), उदयजी सामंत साहेब (उद्योगमंत्री तथा पालकमंत्री-रत्नागिरी), पंकजजी भोयर साहेब (शालेय शिक्षण राज्यमंत्री-महाराष्ट्र राज्य), ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब (शिक्षक आमदार-कोकण विभाग), निरंजनजी डावखरे साहेब (पदवीधर आमदार-कोकण विभाग), किशोरजी दराडे साहेब (शिक्षक आमदार-नाशिक विभाग) सत्यजित तांबे साहेब (पदवीधर आमदार-नाशिक विभाग), जयंतजी आसगावकर साहेब(शिक्षक आमदार-पुणे विभाग), ज मो अभ्यंकर (शिक्षक आमदार-मुंबई विभाग), हेमंतजी सावरा (खासदार-पालघर),भास्कररावजी भगरे सर (खासदार-दिंडोरी), प्रसन्न जोशी (जेष्ठ पत्रकार- एबीपी माझा), सचिन्द्रजी प्रतापसिह साहेब (शिक्षण आयुक्त-महाराष्ट्र), संपतजी सुर्यवंशी (शिक्षणसंचालक -महाराष्ट्र) ,महाराष्ट्र टीडीएफ चे कार्याध्यक्ष नरसु पाटील,उपाध्यक्ष आर एच बाविस्कर, कोषाध्यक्ष निशांत रंधे, सदस्य डॉ एन डी नांद्रे, नाशिक विभाग अध्यक्ष संजय पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.






