विरवाडे नंदुरबार बस सुरू करण्यात यावी ह्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे) हसन मुश्रीफ यांना निवेदन

चोपडा आगारातून विरवाडे नंदुरबार बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी ह्या करता गावातील सरपंच व राष्ट्रवादी अजित पवार गट चे उद्योग विभागाचे देवेंद्र कोळी व कार्यकर्त्यांनी चोपडा आगार प्रमुख यांची भेट घेतली असता चोपडा आगारात बसेस च तुटवडा असल्या मुळे सद्या बस सुरू करता येणार नसल्याचे सांगितले.


नवीन बस आल्यावर वीरवाडे नंदुरबार बस पूर्ववत सुरू करण्यात येईल अशा आशयाचे आगार प्रमुखांचे पत्र घेऊन मुंबई मंत्रालयात जाऊन हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री व वाशिम पालकमंत्री यांना निवेदन देऊन प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असे ह्यावेळी सांगण्यात आले.
ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, दिपक भोई जिल्हाध्यक्ष जळगाव, सौ मथुरा सुरजुसे, अमरावती शहर कार्याध्यक्ष उद्योग विभाग,राष्ट्रवादी उद्योग विभाग चे चोपडा तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी उपस्थित होते .






