अनिलराज पाटिल यांच्या वीर जवान या चित्रास दिल्ली येथे ऑल इंडिया आर्ट एक्सिबिशन मध्ये 2 रे पारितोषिक…
दर वर्षी प्रमाणे 26 जानेवारी निमित्त दिल्ली येथील नेत्रांजली आर्ट गॅलरी तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन झाले यात अनेक चित्रकार सहभागी झालेत अनिलराज यांच्या वीर जवान या वॉटर कलर च्या चित्रास 2 ऱ्या क्रमांक चे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले, अनिलराज यांनी शहीद वीर जवान यांचे पार्थिव असते त्यावर जेव्हा तिरंगा झेंडा लावून घरी येते व सोबत त्यांची रायफल दाखवली आहे, तसेच चेन्नई च्या जे पी आर्ट येते 8 मार्च जागतिक महिला दीना निमित्त चित्रकला व स्पर्धेत ही अनिलराज यांनी नारी शक्ती चे रुप पेन इंक च्या साह्याने रेखाटन केले आहे


यात देखील पहिल्या क्रमांक च पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं असून, सुवर्ण पदक, स्मृती चिन्ह, आय डी कार्ड, व अवॉर्ड सर्टिफिकेट, ई पोस्टर असे पारितोषिक दिले आहे…. अनिलराज हे चोपडा येथील ललित कला महाविदयालया चे माझी विध्यार्थी असून सद्या पेंटर काम, मूर्तिकाम करून आपली उपजीविका भागवत आहे, त्यांना अनेक पारितोषिक मिळाले आहे.


त्यांना नेहमी ललित कला महाविद्यालयाचे माझी प्राचार्य महाजन सर, प्राचार्य बारी सर, प्राध्यापक पाटिल सर, प्राध्यापक नेवे सर, भगवान बारी, अतुल अडावद कर,प्रवीण मानकरी, पुण्याचे चित्रकार चंद्रशेखर कुमावत सर, चित्रकार मिलिंद विचारे सर ,पेंटर रविकला , पंकज नागपुरे सर,हेमराज पाटिल सर, पवन पाटिल, मित्र परिवार,.. यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात…. अनिलराज यांनी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून या पारितोषिक मिळन्या मागे सर्व
गुरुजन,, परिवार, मित्र यांचि साथ आहे असे सांगितले…..







