आदर्शाच्या शोधात या विषयावर डॉक्टर सागर देशपांडे,पुणे यांचे चोपड्यात व्याख्यान
चोपडा ( प्रतिनिधी ) येथील प्रतिवर्षाप्रमाणे स्वर्गीय यशवंत गोविंद हरताळकर उर्फ नानासाहेब माजी मुख्याध्यापक व सेक्रेटरी चोपडा शिक्षण मंडळ चोपडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त 7 डिसेंबर 2024 शनिवार रोजी दुपारी 4 : 30 वाजता विवेकानंद विद्यालय यावल रोड येथे पुणे येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि पत्रकार जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर सागर सुधाकर देशपांडे यांचे “आदर्शाच्या शोधात ” या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे तरी रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. विकास हरताळकर. हरताळकर हॉस्पिटल व परिवार,विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा यांनी केले आहे.








