रुग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट # जळगावात महामार्गावर थरार# सुदैवाने जीवित हानी नाही रुग्णवाहिका जळून खाख
धरणगावहून जळगावकडे येणाऱ्या रूग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.


या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव येथून जळगावकडे येणाऱ्या एमएच 14 सीएल 0791 या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपच्या जवळ अचानक आग लागली. यात असलेल्या ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यातील ड्रायव्हरने तात्काळ प्रसंगावधान राखत अँब्युलन्सला थांबवत यातून खाली उडी मारली. स्पोट येवढं भयानक होता यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. सदर घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यात ही रूग्णवाहिका जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. तर, यामुळे वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. पोलीसांनी काही काळाने वाहतुक सुरळीत केली.


काही दिवसा पूर्वी चोपडा येथील उभ्या रुग्णवाहिकेने पेट घेतली होती यावरून जिल्ह्यातील रुग्णवाहिकाच्या फिटनेस टेस्ट वरती प्रश्नचिन्ह ?उपस्थित केला जात आहे रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका जर आजारी असेल तर रुग्णाचा जीव वाचणार असा अशी चर्चा होऊ लागली आहे






