
चोपडा – (प्रतिनिधी ) :- चोपडा येथील उपजिल्हारुग्णाल व कोव्हीड-19 कोरोना रुग्णालयातील रुग्णांना माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त फळे, सँनिटॉयझर व मास्क चे वाटप करणे साठी शहर भारतीय जनता पार्टीचे वतीने उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांचे कडेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले.
या वेळीसरचिटणीस मनोहर बडगुजर ,सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष गोपाल पाटील, प्रवीण चौधरी युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, सरचिटणीस रितेश शिंपी , व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे गणेश पाटील ,सुनील पाटील ,संतोष बोरसे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी सर्वानी फिजिकल डिस्टन्स चे पालन केले.
