चोपडा तालुक्यात आदिवासी दिवस उत्साहात साजरा # आमदार दांपत्यच्या मिरवणूक बघून विरोधकांचा पाया खालची वाळू सरकली
चोपडा तालुका हा माघील 15 वर्षांपासून आदिवासी मतदार संघ म्हणून राखीव असल्या मुळे आदिवासीना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.संयुक्त राष्ट्र महासभेने 1994 मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा ठराव संमत केला होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आदिवासी लोकांच्या हक्कांवर जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी पावले उचलणे आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हा आहे. म्हणून आदिवासी दिवस साजरा करण्याची संकल्पना होती.


मात्र सध्या 9ऑगस्ट आदिवासी दिवस हा राजकारण्यांसाठी शक्ती प्रदर्शन म्हणून साजरा होत असल्याचे दिसून येते मागील काही वर्षात चोपडा तालुक्यात पण असेच काही चित्र दिसून येत आहे माघील 10 वर्षांपासून तालुक्याची धुरा ही आमदार सोनवणे दांपत्य सांभाळत आहे त्यात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व विद्यमान आमदार लता सोनवणे यांनी तालुक्यातील विकास कामासाठी कुठे ही निधी कमी पडू दिला नाही आमदार दाम्पत्य ने ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहून नेली त्याच विकास कामाचा जोरावर आज एका हाकेवर हजारो आदिवासी उत्साहात शामिल झाले व कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या मिरवणूकीचे भव्य स्वरूप पाहून विरोधकांचा पाया खालची वाळू सरकली









