
जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे तीन, चोपड्याचे चार तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 266 झाली आहे.

चोपड्यात चार जण पोजिटिव्ह सापडले पुन्हा
आज 18 रुग्णाचे अहवाल प्राप्त झाले असून पैकी 14 रुग्णाचे अहवाल निगेटिव आले आहेत तर चोपडा येथील आदर्श नगर येथील 4 रूग्ण हे एकाच परिवाराचे पॉज़िटिव 45 वर्षीय पुरुष 33 वर्षीय महिला आणि दोन मुलं आहेत .तर चोपडा शहरात आता एकूण 13 पॉज़िटिव रुग्ण आहेत