महाराष्ट्र 9

अडावद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर चोपड्यातील कोविड केअर सेंटर मध्ये यशस्वी उपचार

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी):-अडावद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर चोपड्यातील कोविड केअर सेंटर मध्ये यशस्वी उपचार झाल्याने चौदा दिवसांनी पहिला रुग्ण
कोरोनामुक्त झाला आहे.दरम्यान आज दि.१६ रोजी संध्याकाळी ६ वाजता कोविड केअर सेंटर मधून पहिल्या कोरोना मुक्त रुग्णाला प्रशासनातील अधिकान्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला यावेळी कोरोनामुक्त रुग्णावर डॉक्टर व अधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कोरोनामुक्त रुग्णाला रुग्णवाहिकेतून अडावद येथील घरापर्यंत सोडण्यात आले.परंतु गावात गेल्यावर कोरोनामुक्त रुग्णाचे स्वागत झाले नाही म्हणून रुग्णाने खंत व्यक्त केली .

मृताचा दि.२ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने चोपडा तालुक्यात कोरोना एंट्री केल्याने प्रचंड खडबळ उडाली होती.मृताच्या संपर्कात आलेल्या २४ संशयितांना चोपडा येवील कोविड केअर सेंटर मध्ये कॉरंटाईन करण्यात आले होते.२४ संशयितां पैकी एका संशयिताचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.त्या पॉझिटिव्ह रुग्णावर चोपडातील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते.

***कोरोना मुक्त झाल्याचा आनंद पण…***

अडावद गावातील कोरोना पॉझिटिव्ह एक रूण चौदा दिवसाच्या उपचारानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन दि.१६ रोजी संध्याकाळी ७ वाजता आपल्या घरी परतला बाचा आनंद त्या रुग्णाला व त्याच्या परिवारातील सदस्यांमध्ये दिसत होता यावेळी रुग्णाचे स्वागत होणे अपेक्षित होते.परंतु एखादा गरीब माणूस कोरोना सारख्या महामारीतून मुक्त होऊन घरी परतल्यावर ना भाऊबंदकी ना गावातील कोणीच नागरिकांनी स्वागत केले नाही त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाने खंत व्यक्त केली.याच ठिकाणी जर एखादा गर्भ श्रीमत,प्रतिष्टीत व्यक्ती किंवा एखादा मोठा राजकीय व्यक्ती घरी परतला असता त्याच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते व नागरिक स्वागतासाठी आले असते मात्र गरीबाच्या स्वागतासाठी कोण पुढे येणार ? अशी खंत वजा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे,आरोग्य सेवक विजय देशमुख,आरोग्य सेवक सुधीर चौधरी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

****आनंदाश्रू तरळत होते.***

चौदा दिवसात रुग्णामध्ये कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नाही किंवा गेल्या पाच दिवसात ताप किंवा इतर लक्षणे आढळून आली नाहीत त्यामुळे केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने निग्मीत केलेल्या नवीन मार्गदर्शक सुचने प्रमाणे अडावद येथील कोरोनामुक्त रुग्णाला पोलीस निरीक्षक मनोज पवार,मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,नगरपालिके चे गटनेते जीवन भावविवश होऊन कोरोनामुक्त स्नाने उपचार आज १६ रोजी संध्याकाळी प्रशासनातील करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच अधिका-यांच्या उपस्थितीत सुटी देण्यात आली या प्रसंगी कोरोनामुक्त रुग्णावर अधिकारी व डॉक्टरांनी पुष्पवृष्टी केली.त्यानंतर रुग्णाला रुग्णवाहिकेतून चौधरी,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशासनातील अधिका-यांचे आभार व्वक्त केले. कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेऊन डॉ.प्रदीप लासुरकर,कोविड सेंटरचे डॉ.सुरेश पहिला कोरोनामुक्त झालेल्या अडावद येथील पाटील.पो.हे.कॉ संतोष पारधी.पो.ना. विलेश अडावद येथील घरापर्यंत सुखरूप सोडण्यात रुग्णाला निरोप देताना तहसीलदार अनिल सोनवणे,पो.कॉ.विजय बच्छाव आदी कर्मचारी आले.यावेळी कोरोनामुक्त रुग्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर झाले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]