
लॉकडाऊनमुळे शेतकर्यांची यशोगाथा एैवजी दुर्दशाच…
चोपडा..प्रतिनिधी ,
देशावर,जगावर एकुण एकंदर अखिल मानवजातीवर कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने सध्याच्या संचारबंदीमुळे उद्योग व्यवसायांसोबत जगाचा पोशिंदा शेतकरीराजा सुध्दा हतबल झाला आहे.आधीच लहरी निसर्गचक्राने अवकाळी पाऊस,वारावादळ,गारपीट आदींमुळे शेतातील तोंडी आलेला घास हिरावुन घेतलेला आहे.तद्नंतर आलेल्या शेतीमालाला लॉकडाऊनमुळे भाव मिळत नसल्याने सध्या शेतकर्यांची यशोगाथा एैवजी दुर्दशाच झालेली आहे.अशी खंत खरबुज उत्पादक शेतकरी व चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक..जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
आध्यात्मिक,धार्मिक,सामाजिक कार्याची आवड असलेले श्री.बाविस्कर हे नोकरी करून उत्तम शेतीही करतात.ह्यावर्षी त्यांनी केळी पिकांत खरबुज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.तालुका क्रुषि अधिकारी..पी.एन्.चौधरीसाहेब यांनी त्यांच्या ह्या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.यासाठी त्यांना नालखेडेकर पो.पा.संजय शिरसाठ यांचे मार्गदर्शन तर धानोरेकर आबा सोनवणे यांचे सहकार्य लाभले.दोन्ही पिकांना लागणारा खर्च हज्जारों रूपयांचा असुन लाख्खोंचे उत्पन्न अपेक्षित होते.पण सध्याच्या कोरोना लॉकडाऊनमुळे खरबुजला पाहीजे तसा भाव न मिळाल्याने मेहनत व नफा तर दुरच.. लागलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.शेतात पक्वं झालेला माल काढुन हातविक्री करावा लागला.थोडाफार माल व्यापार्यांनी मनमानी करून अत्यल्प दराने खरेदी केला.दररोज शेकडों फळांचे मोफत वाटप करण्यात आले.मालाला उठाव नसल्याने शिल्लक राहिलेला माल बांधावर फेकावा लागला.बराच माल अतिउष्णतेमुळे शेतातच खराब झाला.त्यामुळे खुपच नुकसान सहन करावे लागत आहे.अशीही चिंता गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.