महाराष्ट्र 9

अमळनेरच्या दोन कोरोना बाधित सह चोपड्यात दहा कोरोना बाधित,पाच महिला व  पाच पुरुषांचा  समावेश

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा येथे प्रशासकीय इमारतीत क्वारंटाईन केलेल्या रुग्णांपैकी ४४ रुग्णांचे स्वॅब जळगाव येथील सामान्य रुग्णालयात चाचणीसाठी दिनांक ११ रोजी पाठविण्यात आले होते. त्यापैकी अमळनेरचे 2 मुलांसह चोपडा येथे 10 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि पाच स्त्रीयांचा समावेश असल्याचे अधिकृत सूत्रांनी कळविले आहे. दहा रुग्णांची वर्गवारी अशी-पाच रुग्ण खुर्शिद अळीमधील तर दोन रुग्ण बेलदार अळी मधील, दोन रुग्ण हे अमळनेर येथील रहिवासी असून चोपडा येथे नातेवाईकांकडे आल्यामुळे त्यांना चोपडा येथेच क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि एक रुग्ण अडावद येथील असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर कळवले आहे.

पाच पुरुष पॉझिटिव रुग्णांमध्ये अडावद येथील 29 वर्षे वयाचा एक तरुण, चोपडा येथील खुर्शिद अळीमधील एक 42 वर्षाचा तरुण तर दुसरा सतरा वर्षाचा युवक तर अमळनेर येथील मुलांमध्ये एक 14 वर्षाचा दुसरा दहा वर्षाचा हे दोन्ही सख्खे भाऊ असल्याचे समजले आहे.

या मुलांची आई सुद्धा अमळनेर येथे कोरोना पॉझिटिव असल्याने तिच्यावरही त्या ठिकाणी उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही बालकांना जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले त्यावेळेस ते मोठ्याने प्रशासकीय इमारतीत रडत असल्याचे समजले.

तर पाच स्त्री कोरोना पॉझिटिव रुग्णांमध्ये दोन बेलदार अळी मधील रहिवासी असून एक तीस वर्षाची महिला आहे तर दुसरी सात वर्षाची मुलगी आहे. आणि खुर्शीद अळी मधील साठ वर्षे वयाची वृद्ध महिला, 35 वर्षे वयाची महिला आणि दहा वर्षाची मुलगी असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

दरम्यान सदर पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांची माहिती प्रशासन उपलब्ध करून त्यांना तात्काळ क्वारंटाईन करून पुढील उपाय योजना राबवित आहे.

यासह नगरपालिकेकडून कंटेनमेंट झोन मध्ये तात्काळ फवारणी करणे सुरू असून खुर्शिद अळीमधील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरामध्ये आणि परिसरात तसेच बेलदार अळी मध्ये पॉझिटिव आलेल्या रुग्णांच्या घरांमध्ये आणि परिसरात फवारणी करून सॅनिटाईज करण्याचे काम वेगाने सुरू होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]