चोपडा कृषी उत्तप्न बाजार समितीचे 3 कोटी 90 लाखाचे विक्रमी वार्षिक उत्पन्न..
वर्षपूर्ती कार्यक्रमात सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली माहिती…
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा वर्षभराच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामपंचायतीचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन यांच्या उपस्थितीत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती उपसभापती यांनी वर्षभरापासून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय ,केलेले काम, झालेला नफा या संदर्भात सविस्तर माहिती दिली.


यात सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले मला मिळालेल्या सभापती पदाचा संपूर्ण कार्यकाळ शेतकरी हितासाठीच काम केले. विद्यमान आमदार लताताई सोनावणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगितले वर्षभरामध्ये संपूर्ण खान्देशात नसतील अशा सर्व सुख सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिल्या. जीर्ण झालेलं शेड दुरुस्त केलं आहे. वर्षभरामध्ये व्यापारी शेतकरी हमालमापाडी यांच्या समन्वयाने कुठेही दुरावा निर्माण होऊ दिला नाही.शेतकरी हिताचे निर्णय घेताना संचालक मंडळांनी कधीही विरोध केला नाही. वर्षभराच्या कार्यकाळामध्ये 3कोटी 90 लाखाचा नफा मिळवला असेच सर्वांचे अनमोल सहकार्य माझा पाठीशी असल्यास येणाऱ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेणे सोपे होईल असे ह्या असल्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले यावेळी उपसभापती विनायक चव्हाण, ज्येष्ठ संचालक घनश्याम पाटील यांच्यासह संचालक सचिव कर्मचारी ग्रामपंचायत चे सरपंच विकास सोसायटीचे चेअरम व्यापारी हमाल मापाडी आदी उपस्थित होते.







