मुजोर अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी,
अवैध वाळू वाहतुकीचा चोपडा तालुक्यात सुळसुळाट, अधिकाऱ्यांचे अभय
चोपडा प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात अवैध वाळूची सरार्स पणे रात्री नव्हे तर दिवसा वाहतूक सुरु आहे. यासाठी अधिकाऱ्यांना वाळू माफियांना चिरीमिरी केल्याने ते सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. नुकतेच गोरगावले येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत नारखेडे यांनी दि.16 /03/2024 रोजी कोळंबा येथील (एकाचे) यांचे अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टर जमा करण्यात आले होते.

त्याचा पंचनामा करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सुपूर्त ही करण्यात आले होते. तशी माहिती माहिती मंडळ अधिकारी चंद्रकांत नारखेडे यांनी प्रत्यक्ष बोलण्यातून दिली आहे. असे असतांना ही मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टरचा कोणताही दंड न वसूल करता ट्रॅक्टर घेवून जाण्यास सहमती दर्शवली. महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने ट्रॅक्टर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातून लगेच गायब झाले. त्याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट घेवून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण देत संबंधित अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर विषयी कारवाही करण्याचा संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली. उलट पत्रकारांवर संताप करत अरेरावी ची भाषा केली. तहसीलदार थोरात शहरासह तालुक्यातील सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना यापूर्वी कार्यालयातून बाहेर काढण्याची आणि अरेरावीची भाषा यापूर्वी अनेक वेळा वापरली आहे.

त्याच अनुषंगाने वरील अवैध वाळू वाहतुकी विषयी माहिती विचारणा केली असता नेहमी प्रमाणे कार्यालयातून बाहेर काढण्याची भाषा केली. तसेच तुम्हाला काय लिहायचे ते लिहा, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,काही बिघडवू शकत नाही असे वक्तव्य करत मुजोरपणा दाखविला.अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करून वठणीवर आणावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
