
आज दिनांक 10/05/2020 रोजी मुंबई येथून पायपीट करत, कुठे रस्त्याने खाजगी वाहनाने प्रवास करत, गेल्या पाच ते सहा दिवसापासून मध्यप्रदेश कडे निघालेले मजूर आज चोपडा येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोहचले. ही बाब चोपडा तहसीलदार यांना समजताच त्यांनी त्या मजुरांना थांबवून त्यांना बसने सोडण्याचे आश्वासन देत, सर्वांना चोपडा आगारात आणून त्यांचे मेडिकल चाचणी केले. त्यांना चहा नाष्टा देऊन चोपडा आगार व्यवस्थापक यांचे मदतीने दोन बसेस मध्ये प्रत्येकी 16 मजूर बसतील या प्रमाणे नियोजन केले. आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना मा तहसीलदार यांनी सर्वांना दिल्यात. त्यावेळेस उपविभागीय पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब, चोपडा तहसिलदार अनिल गावित, आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनिल बाविस्कर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए टी पवार, तहसील लिपिक लियाकत तडवी भाऊसाहेब, पेसा समन्वयक प्रदिप बाविस्कर, एस टी चे वरिष्ठ लिपिक डी.डी चावरे वाहन परीक्षक डी.एस सुर्वे वाहतूक नियंत्रक एस के शेख बस चालक आर जी बोरसे 18969, चालक. एस.एन.पाटील 10547
सुरक्षारक्षक श्री. संभाजी पाटील आदी उपस्थित होते. व नगरपालिका कर्मचारी यांनी बस स्थानक लागलीच निर्जंतुक औषध फवारणी केली.
