महाराष्ट्र 9

आय जी पथकाचा कारवाईत ५२ लाखाचा गुटखा जप्त ..ग्रामीण पोलीस निद्रस्थ?

[espro-slider id=13780]

आय जी पथकाचा कारवाईत ५२ लाखाचा गुटखा जप्त ..ग्रामीण पोलीस निद्रस्थ?


चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा तालुक्यातून ग्रामीण भागातून गुटखा वाहतूक होत असल्याचे नाशिक येथील आय जी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीचा आधारे कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात पथकाला यश आले आहे .
चोपडा येथील उमर्टी, सत्रासेन , उत्तमनगर,लासूर, हिगोणा मार्गे जळगाव जाणारी आयशर गाडी क्र.एम एच १९ सी वाय ६९७२ ही गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती बी.जी.शेखर पाटील विशेष पोलिस महानिक्षक यांचा विशेष पथकला मिळाली असता अकूलखेडा जवळील चावरा शाळे जवळ पकडण्यात आले. गाडीत ५२ लाख रुपयाचा गुटखा व आयशर गाडी सह एकुण ६२ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अमोल युवराज पाटील ,ललित माधव जाधव , कल्पेश अशोक साळुंखे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेला माल हा जळगाव येथील अरुण पाटील यांचा असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे .


चोपडा ग्रामीण पोलीस हद्दीतून कोट्यवधी रुपयाचा गुटख्याची तस्करी होत असताना ग्रामीण पोलिसांचा निदर्शनात येत नाही का?अशी चर्चा रंगू लागली आहे .उमर्टी ते चोपडा ३५ किलो मीटरच्या अंतरात कुठेही गाडी तपासण्याची गरज भासली नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे. का ? चोपडा ग्रामीण पोलिस निद्रीस्त आहेत का? अशी चर्चा गावागावात रंगू लागली आहे.
मध्यप्रदेशातून अवैध गुटखा, गावठी कट्टे यांची तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिस स्टेशन कडून ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तरी देखील ग्रामीण पोलिस स्टेशन मार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]