महाराष्ट्र 9

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर

[espro-slider id=13780]

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर

चोपडा दि.२२डिसेंबर २०२३:पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांचे शिफारसी नुसार एकात्मिकृत विकासासाठी चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती कार्यकारिणी नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे.


या समितीत पालकमंत्र्यांनी सुचविलेले तथा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत निवडून आलेले आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे(अध्यक्ष),तर संबंधित पंचायत समितीचे सभापती सह अध्यक्ष , तहसिल विभागातील खरेदी विक्री संस्थांचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य आणि तहसीलदार हे पदसिद्ध सचिव सचिव म्हणून काम पाहतात.

या कार्यकारणीत जिल्हा नियोजन मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे पालकमंत्री विविध प्रवर्गातील ५ अशासकिय सदस्य आणि ३ महिला सदस्यांची नियुक्ती करतात. तालुका अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली असून त्यात मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील रा. मोहिंदा शिवराज संभाजी पाटील रा. सनफुले ,कैलास राजाराम बाविस्कर रा. लासुर ,नामदेव बाबूराव पाटील, रा. वडगाव बु., गोपाल श्रीराम पाटील, रा. नारोदा अशासकीय महिला सदस्यशीतल गोपाल देवराज, रा. गालंगी सौ. पुष्पाताई सुनील जैन, रा. चोपडा सौ. उज्वला भास्कर पाटील, रा. गणपूर उपरोक्त नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे,कृऊबा सभापती नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी, विकास पाटील आदींनी अभिनंदन केले आहे .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]