आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी समस्या निवारण मेळावा
चोपडा तालुक्याच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानी संदर्भात ,जमिनीची पोट खराब व पी एम किसान योजना संदर्भात अडचणी येत असतील अशा शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण मेळावा दि.३०/११/२०२३ गुरुवार रोजी सकाळी ११:००वाजता चोपडा येथे शरदचंद्रीका आक्का नाट्यगृह नगर परिषद येथे शेतकरी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना इतर अडचणी असतील अशा शेतकऱ्यांनीही सदर मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हाव करण्यात आले आहे


