महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील पेव्हर ब्लॉक चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी.आर.पी.आई.तालुका अध्यक्ष भिवराज रामदास रायसिंगे

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील पेव्हर ब्लॉक  चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी.आर.पी.आई.तालुका अध्यक्ष भिवराज रामदास रायसिंगे

भिवराज रामदास रायसिंगे, व वर्धमान भूरेसिंग पाटील, दोघे रा. नागलवाडी ता. चोपडा यांनी नागलवाडी येथीलनागलवाडी येथील पेव्हर ब्लॉक चे काम हे नित्कृष्ट दर्ज्याचे झाले असून त्या कामाची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी या करता जिल्हाधिकारी यांना तक्रार करण्यात आली हे पेव्हर ब्लॉक चे काम नित्कृष्ट दर्ज्याचे झाले असून नागलवाडी ता. चोपडा या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत जळगांव जिल्हयातील कामाच्या यादीतील अनु.क्रं. १७४ अन्वये नागलवाडी येथील पेव्हर ब्लॉकचे काम समाविष्ट आहे. सदर कामास सन २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यत देण्यात आलेली आहे.

सदर कामास दि.०४/१०/२०२१ रोजी दिलेल्या प्रशासकीय मान्यते नुसार सदर काम हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत करण्याचे प्रस्तावीत आहे. असे असतांना देखील सदर काम हे अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या वस्तीत न करता जनरल घटकांच्या वस्तीत करण्यात आलेले आहे.

त्याच प्रमाणे सदर कामात जा.क्र./साबांविक्र-२ज/प्रशा-२/२०२२ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं.२ जळगांव यांनी दि.०३/०१/२०२२ रोजी तांत्रिक मंजुरी व अंदाज पत्रकास मंजुरी दिलेली आहे. तरी महाशय सदर तांत्रिक मंजुरी व अंदाज पत्रीय प्रमाणे सदर काम हे पुढील तरतुदी प्रमाणे करणे क्रमप्राप्त आहे. तरतुद नं.१ :- ०.२० मीटर जाडीचे खोदकाम करणे,तरतुद नं.२ :- ०.०७५ जाडीचे PCC करणे,तरतुद नं.३ :- ६१ मीटर लांब ४ मीटर रुंद या मापात पेव्हर ब्लॉक बसविणे,तरतुद नं.४: एम १० काँक्रीट टाकणे,तरतुद नं.५ : कामाच्या ठिकाणी दर्शनी फलक लावणे.

या तरतुदी प्रमाणे सदर काम करणे हे क्रमप्राप्त आहे व होते परंतु सदर काम करतांना संबंधीत अभियंता व ठेकेदार यांनी तांत्रीक मान्यतेचे व अंदाज पत्रकाचे सर्व नियम व तरतुदी धाब्यावर ठेवून संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे. सदर काम करतांना १:४:८ पीसीसी हे तरतुद क्र.२ चे काम करण्यात आलेले नाही. त्यावरुन असे प्रथमदर्शनी दिसते की, सदर अभियंता व ठेकेदार यांनी नियमाचे उल्लंघन केलेले आहे. तसेच सदर काम हे तरतुद क्रं.३ नुसार २४० चौ.मी. करणे प्रस्तावीत आहे मात्र सदर काम संबंधीत कामाच्या मोजमाप पुस्तिकेत २९८ चौ.मी. इतके दाखविण्यात आलेले आहे, मात्र प्रत्यक्षात कामाच्या मुळ ठिकाणी सदर काम हे २५५.२ चौ.मी. इतकेच करण्यात आलेले आहे. यावरुन संबंधीत अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने जनतेच्या व शासनाच्या पैश्यांची लुट करण्यासाठी दिशाभूल करणारी दस्तऐवज तयार करुन सदर कामाचे फुल अॅण्ड फायनल बील काढून घेतलेले आहे. हे सारे सदर कामाची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यत व अंदाजपत्रक तसेच सदर कामाची मोजमाप पुस्तिका व फुल अॅण्ड फायनल बील याचे अवलोकनावरुन सिध्द होते.तरीसदर कामाची विभागीय चौकशी होवून संबंधीत अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच संबंधीतांनी जनतेचा व शासनाचा पैश्यांची केलेली लूटीची रक्कमेची वसूली करण्यात यावी व या संबंधीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हांस प्राप्त व्हावा व सदर चौकशी ही अर्जदारांच्या समक्ष व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]