दरोडा टाकण्याचा तयारीत असलेले सात जणांचा टोळीला पकडण्यात चोपडा शहर पोलिसांना यश …
दि.२२रोजी चोपडा धरणगाव रस्त्यावरील तापी सूतगिरणीचा पुढील वळणावर सकाळी सुमारे ४:३० ते ६:३० वाजेचा दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले मध्य प्रदेशातील सात तरुणाचा टोळीला पकडण्यात चोपडा पोलिसांना यश आले आहे .

आरोपी दादला सिराम नरगावे वय २० रा किरचली ता सेंधवा जि बडवाणी ,सियाराम बेलोरसिंग चौहाण वय २३ रा झेंडीखोद्री ता सेधंवा जि बडवाणी ,जगदीश दमडीया नरगावे वय २४ रा किरचली ता सेधंवा जि बडवाणी , ईकेश रामलाल सोलंकी वय १९ रा कुमठाणा ता सेधंवा जि बडवाणी , अर्जुन बलीराम आर्य वय १९ रा इ ॉडीखोद्री ता संधंवा जि बडवाणी ‘कमिस झगा सोलंकी वय १७ रा किरचलो ता सेंधवा जि बडवाणी , ललित बन्सी मोरे वय १५ रा किरचली ता सेधंवा जि बडवाणी व त्यांचे इतर २-३ साथीदार हे दरोडा घालण्याचे उद्देशाने त्यांचे ताब्यात दरोडा घालण्याच्या लोखंडी रॉड, लोखंडी गज, मिरची पूड, लोखंडी पक्कड (पेन्चीस), २लोखंडी पान्हे (स्पॅनर), एक प्लॅस्टीक मुठ असलेला चाकू, लाल रंगाची प्लॅस्टीक मुठ असलेली धारदार लोखंडी करवत साहित्यासह त्यांचे ताब्यातील महिद्रा पिकअप वाहन क्रंमाक एम पी ०९ जी सी ५०६१ त्यामध्ये महिंद्रा कपंनीचे जनरेटर मशिन सह एकून तीन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल मिळुन आले.

वरील सर्व आरोपी विरुध्द भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक घनशाम तांबे करत आहे.
