महाराष्ट्र 9

चोपड्यात शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रतिमेची उभारणी

[espro-slider id=13780]

चोपड्यात शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रतिमेची उभारणी

चोपडा(प्रतिनिधी) सचिन जयस्वाल


टायगर ग्रुप चोपडा व आई भवानी युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त पुढाकाराने शहरातील मराठे गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव स्मारकची प्रतिमा उभारण्यात आली आहे. लोकवर्गणीतून सदर स्मारकाची उभारणी करण्यात आली.या स्मारकाचे अनावरण पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गजेंद्र जैसवाल,पो.निरीक्षक विनायक लोकरे,दिलीप नेवे उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, युवा वर्गाने महाराजांचे जे स्मारक प्रतिमा उभारली आहे ते तालुक्यातील पहिलेच आहे.तेव्हा युवकानी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराने प्रेरित होऊन समाज उभारणीत आपला वाटा उचलला पाहिजे.राष्ट्र उभारणीत तरुणांनाचे योगदान महत्वपूर्ण असते.तेव्हा आपण देखील समाजाभिमुख काम करीत रहावे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.चंद्रहास गुजराथी व विनायक लोकरे यांनी देखील युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी टायगर ग्रुपचे अध्यक्ष राकेश मराठे यांच्यासह देवानंद लोहार,गुणवंत मराठे,कैलास शिंपी,अशोक गुर्जर,रवी वेंडर,नारायण मराठे,योगेश शिंपी,संदीप मराठे,भरत मराठे,संदीप मराठे,शामराव मराठे, महेश पाटील,आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]