महाराष्ट्र 9

मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेज,चोपडा येथे कोणतेही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसताना बोगस शिक्षण सेवक भरती.. #स्वघोषित अध्यक्ष यांचा मनमानी कारभार …

[espro-slider id=13780]

मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेज,चोपडा येथे कोणतेही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसताना बोगस शिक्षण सेवक भरती..

स्वघोषित अध्यक्ष यांचा मनमानी कारभार..

चोपडा बोगस शिक्षण सेवक भरती प्रकरणी चोपडा उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी दि.२५/८/२०२३ रोजी शिक्षण सेवक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले सदर प्रस्तावाचे अवलोकन केले असता धर्मदाय आयुक्त नाशिक यांचा कडे अपील दाखल केले होते सदर आदेशान्वये विद्यमान संस्थेचे कार्यकारी मंडळ२०११ते २०१४हे रद्द करण्यात आल्याने सध्या कोणतेही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नाही त्यामुळे सादर करण्यात आलेले नियुक्ती आदेशाना संस्थेचा अंतर्गत वाद मीटे पर्यंत नवीन कार्यकारी मंडळ स्थापन झाल्या शिवाय श्रीमती नाहीद कौसर मलक बशीर अहेमद,मोहम्मद परवेज मोहम्मद हारून,नाजीया बी इमरान अली सैय्यद ,शोएब खान सुलतान खान,पिंजारी शकील अहमद शेख अय्युब,मजहर खान शकील खाँ,सैय्यद मसरत अली सैय्यद हजरत अली,सईद अब्दुल रशीद नदिम खान अहेसान खान यांचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर शिक्षण सेवक भरतीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचा खुलासा शिक्षण अधिकारी यांनी केला .


स्वयंम घोषित चेअरमन फिरोज खान हाजी मेहबूब खान व स्वघोषित मुस्तफा एज्युकेशन सोसायटीअध्यक्ष असगर अली महेबूब अली यांनी दि.७/५/२०२३ व दि .२४ मे २०२३ दोन वेगवेगळ्या दैनिकात जाहिरात टाकून शिक्षण विभागाची कुटलीही मंजुरी नसताना शिक्षण सेवक व उपशिक्षक पदाची भरती करण्या करता दि.१५/५/२०२३ रोजी मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेज,चोपडा येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत बेरोजगार तरुणाची फसवणूक केले असल्याचे समोर आले आहे कार्यकारी मंडळ शिवाय सुरू असलेल्या संस्थेत स्वयमघोशित अध्यक्ष व संचालकांचा बोलबाला सुरू आहे

ह्या शिक्षण सेवक व उपशिक्षक भरती साठी स्वघोषित अध्यक्ष व संचालक मंडळाने लाखो रुपये घेतले गेले असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे तरी बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध , मनमानी पद्धतीने कारोबार करणाऱ्या स्वघोषित चेरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]