महाराष्ट्र 9

चोपडा येथे 03 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतुस सह आरोपीस अटक…# चोपडा शहर पोलिसांची कारवाही ..

[espro-slider id=13780]

चोपडा येथे 03 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतुस सह आरोपीस अटक…# चोपडा शहर पोलिसांची कारवाही ..

दि. 16 रोजी कार्यालयात सांय 05.30 ते 06.00 वा. च्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने उमर्टी कडुन चोपडा कडे येणाऱ्या बस निळ्या रंगाचे टिशर्ट घातलेला अंदाजे 20 ते 22 वर्ष वय असलेला संशयीत युवक हा गावठी पिस्टल घेवुन चोपडा कडे येत आहे.

त्यावरून चोपडा शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी तात्काळ सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनशाम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ शेषराव तोरे, पोना संदीप भोई, पोकॉ मिलींद सपकाळे, पोकॉ रविंद्र पाटील, पोकॉ प्रकाश मथुरे, पोकॉ प्रमोद पवार, पोकॉ आत्माराम अहीरे या पथकास रवाना केले व सापळा रचला. तात्काळ चुंचाळे कडे जाणाऱ्या रोडवर गुप्त बातमीप्रमाणे त्यांनी चुंचाळे गावाजवळ उमर्टी कडुन चोपडा कडे येणारी बस थांबवुन बस मधील संशयीत युवकाची ओळख पटवुन त्याचे जवळ असलेल्या बॅग ची तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 30 हजार रु कि. चे गावठी बनावटीचे 03 पिस्टल, दोन हजार रु किमतीचे 01 खाली मॅगझीन व 10 हजार रु कि.चे 10 जिवंत काडतुस तसेच रोख 3 हजार 300 रु व 5 हजार रु कि.चा 01 मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 50 हजार 300 रु किं.चा मुद्देमाल आढळला.

संशयिताचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव हनुमान गेनाराम चौधरी (वय 21 वर्ष रा. लोहावत जि. जोधपुर राजस्थान) असे सांगीतलेले असुन त्याने सदरचे पिस्टल व राउंड हे उमर्टी मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्ती कडुन सत्रासेन येथे ताब्यात घेतल्याचे सांगितले. सदर आरोपी विरुध्द चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावळे आणि शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]