महाराष्ट्र 9

2 वर्षा पासून फरार आरोपीतास चोरीच्या मोटार सायकल सह  स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

[espro-slider id=13780]

2 वर्षा पासून फरार आरोपीतास चोरीच्या मोटार सायकल सह  स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, ऋषीकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांनी फरार पाहिजे आरोपी अटक करणे बाबत  किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले होते.


किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन धरणगाव पो.स्टे. ३४८/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५, ७/२५ या गुन्ह्यातील फरार आरोपी काल्या मोरे हा त्याची ओळख लपवून परधाडे ता.पाचोरा येथे राहत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली आहे. तरी आपण सदर ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई असे आदेश दिल्याने वर नमुद पथक हे परधाडे ता. पाचोरा येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता तो मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भुषण उर्फ काल्या तुकाराम मोरे, वय २७, रा. लोणी ता. पारोळा ह.मु. परधाडे ता.पाचोरा असे सांगीतले. त्यावेळी त्याचे जवळ असलेल्या बजाज डिस्कव्हर कंपनीची मो.सा. एम.एच.१८ ए.एस. १२८३ बाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देवू लागला त्यावेळी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदरची मोटार सायकल ही बोरकुंड ता. धुळे येथून शेताचे बांधावरून चोरून आणल्याचे सांगीतल्याने त्याबाबत धुळे तालुका पो.स्टे.ला भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


तरी आरोपी भुषण उर्फ काल्या तुकाराम मोरे, वय २७, रा. लोणी ता. पारोळा ह.मु. परधाडे ता. पाचोरा यास धरणगाव पो.स्टे. ३४८/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५,७/२५ या गुन्ह्यात पुढील कारवाई करीता धरणगाव पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे सदर कारवाही साठी स्थानिक गुन्हे शाके तर्फे किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सफो अनिल जाधव, पोहे संदिप पाटील, प्रविण मांडोळे, भारत पाटील, प्रमोद ठाकुर पथक तयार करण्यात आले होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]