महाराष्ट्र 9

चोपडा शहरातील भुयारी गटारी साठी ८५.६८ कोटीचा निधी मंजूर # निधी मंजुरीचा श्रेय घेण्याकरता राष्ट्रवादी व सेनेत रस्सीखेच …

[espro-slider id=13780]

चोपडा शहरातील भुयारी गटारी साठी ८५.६८ कोटीचा निधी मंजूर # निधी मंजुरीचा श्रेय घेण्याकरता राष्ट्रवादी व सेनेत रस्सीखेच …

चोपडा शहरातील भुयारी गटारी साठी 86 कोटींचा निधी आमदारांच्या प्रयत्नानेच :: सभापती नरेंद्र पाटील
पत्रकार परिषदेतून दिली माहिती

चोपडा शहरातील भूमिगत गटारीचा प्रस्ताव दि.25 ऑगस्ट 2023 रोजी चोपडा शराचा विकासा साठी झटणारे दाम्पत्य सौ मनीषा ताई चौधरी आणि जीवनभाऊ चौधरी यांनी चोपडा शहरातील भूमिगत गटारी साठी शासना कडे निधीची मागणी करण्यात आली त्याला प्रतिसाद देत निधी मिळाला असल्याचा दावा राष्ट्रवादी तर्फे करण्यात येत आहे तर चोपडा तालुक्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे यांनी मागील काही महिन्यांपासून भूमिगत गटारी साठी केलेल्या पत्रव्यवहार चे फोटो व्हायरल करत आमदारानी केलेल्या प्रयत्नामुळे निधी मिळाला असल्याचं दावा केला जात आहे यावरून दोन्ही पक्ष हे श्रेय वादा पोटी रस्सीखेच करताना दिसत आहे . दि.५रोजी चोपडा तालुका शिवसेनेचा वतीने पत्रकार परिषद घेऊन चोपडा नगर परिषदेला मिळालेला निधी हा आमदार सौ लताताई सोनवणे यांचा प्रयत्नांनी मिळाला आहे .


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत चोपडा नगरपालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व आर्थिक मान्यता प्रदान करणेबाबत दिनांक ०३/०२/२०२३ रोजी प्रकल्पस्तरीय मान्यता समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.सदर निधी उपलब्ध होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमदार लताताई सोनवणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेली पत्रे सोबत टाकली आहेत.सोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे O.S.D. राहुल घेठे साहेब याच्याशी केलेल्या पाठपुरावा त्यांनी केलेली मदत यांचे ही स्क्रिनशॉट सोबत आहेत.

चोपड़ा नगरपालिकेला मागील काही वर्षापासुन शासनाने प्रशासक नेमले असुन सदर निधी हा माननीय कार्यसम्राट आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे चोपडा शहरातील नागरिकांसाठी मंजूर करण्यात आला आहे.तरी याचे श्रेय कोणीही घेऊ नये. माजी नगराध्यक्ष हे श्रेय लाटण्या साठी चोपडा शहरात पोस्टर लाऊन जाहिरात करताना दिसत आहे या संधर्भात नगर पालिकेकडे तक्रार करणार असल्याची माहिती याबद्दल कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]