मुस्तफा अँग्लो ऊर्दू हायस्कूल व ज्यू. कॉलेज, चोपडा या शाळेची जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी…
चोपडा (प्रतिनिधी):- 2023-24 च्या सुरू असलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा मुस्तफा अँग्लो ऊर्दू हायस्कूल व ज्यू. कॉलेज, चोपडा शाळेतील खेळाडू यांनी आपली चमकदार कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केलेले आहे. इयत्ता 10वी चा खेळाडू मोमीन मोहम्मद फैजान मोहम्मद जाफर याने 17 वर्षे वयोगटात कॅरम या खेळामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 5 वा क्रमांक मिळवित यश संपादन केले. तसेच 19 वर्षे वयोगटात मोमीन मोहम्मद अल्तमश अब्दुल कादिर या विद्यार्थ्याने 4 थ्या क्रमांकाने तर शेख अतहर हिसामुद्दिन याने 6 व्या क्रमांकाने कॅरम या खेळामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले. या खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून त्याचे मुस्तफा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, असगर अली महबूब अली व संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुस्तफा अँग्लो ऊर्दू हायस्कूल व ज्यू. कॉलेज, चोपडा येथील सर्व खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल मनस्वी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

