चोपड्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची समिती गठीत ; तालुका संयोजकपदी गजेंद्र जैसवाल तर सहसंयोजकपदी अनिल वानखेडे,
यशवंत चौधरींची निवड
चोपडा ( प्रतिनिधी )—–
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक ज्ञानेश्वर भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यातआली.

बैठकीत जळगाव महानगराच्या धर्तीवर चोपडा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली.महामंडळाच्या चोपडा तालुका संयोजकपदी माजी नगरसेवक गजेंद्र जैसवाल तर सहसंयोजकपदी अनिल वानखेडे व यशवंत चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच स्थानिक समिती गठीत करून जाहीर करण्यात आली.यावेळी गणेश भक्त व कार्यकर्त्यांना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा चे जिल्हाध्यक्ष सचिन नारळे व उपाध्यक्ष किशोर भोसले यांनी मार्गदर्शन केले.

सार्वजानिक गणेशोत्सव महामंडळाची समिती- ललित भैय्या चौधरी जळगाव जिल्हा पालक सचिन नारखे-सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जिल्हाध्यक्ष-जळगाव,किशोर भोसले- जिल्हा उपाध्यक्ष जळगाव,गजेंद्र अरविंद जैस्वाल-संयोजक चोपडा तालुका
अनिल सुभाष वानखेडे,यशवंत भगवान चौधरी
सह संयोजक चोपडा तालुका,ज्ञानेश्वर मंगर भामरे – तालुका पालक,मनोज विसावे – तालुका सचिव

***** सन्मानीय संचालक सर्वश्री *****
अमृतराव सचदेव ,भुपेंद्रभाई गुजराथी,अड.धर्मेंद्र सोनार,शेखर पाटील,राजेंद्र पाटील उर्फ बिटवा
आबा देशमुख,राजाराम पाटील, महेश उर्फ भैय्या पवारनरेंद्र पाटील,डॉ.रोहन पाटील,नरेश महाजन,रणजित देशमुख,प्रमोद,भाट,प्रवीण ,जैन,हरीश ,पवार,टी.सी.पाटील,लक्ष्मण महाजन,, संजय चौधरी, महेंद्र भोई,भूषण पाटील,शाम सोनार, सागर चौधरी, गौरव अग्रवाल, विलास बारी, कुणाल जगताप ,किशोर गुजराथी,गौरव सोनार.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थानिक समिती सर्व धर्मियांचे सार्वजनिक उत्सव शांततेत व शिस्तीत साजरे करणार असून महाराष्ट्रात चोपडा शहराचे नावलौकिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले. तसेच शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रशासनासोबत समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सदस्य सक्रिय सहभागी होणार असून,विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणार आहेत.

----- : विनीत : -----
चोपडा तालुका संयोजक गजेंद्र जैसवाल,
सहसंयोजक अनिल वानखेडे,यशवंत चौधरी
** सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ **