श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) चोपडा येथे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा संपन्न..
दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी चोपडा येथील ,श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था चोपडा , येथे प्रथम वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच प्रथम व द्वितीय वर्षातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला .


सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा. आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव मा. डॉ. स्मिताताई संदीप पाटील, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चोपडा नगरीतील उद्योजक मा. सुनील भाई अग्रवाल व आदित्य सुनील अग्रवाल( मॅनेजिंग डायरेक्टर शिवकृपा कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड चोपडा) साळुंखे साहेब (उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ चोपडा ), ए .एम. गायकवाड (सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ चोपडा),एस. पी. पाटील (उपप्राचार्य दादासाहेब सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा), तंत्रनिकेत विभागातील शशिकांत एस पाटील ,एन. आर.पाटील उपस्थित होते.

सुनील भाई अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांच्या जीवनात त्रिसूत्रीपणा कसा असावा व उज्वल भविष्याकडे वाटचाल कशी करावी यावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सचिवसो डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या कोर्सेस व त्यांचे महत्व तसेच भविष्यात आपण विद्यार्थ्यांसाठी अजून नवीन कोर्सेस आणू, विशेषता विद्यार्थिनी साठी नवीन कोर्सेस सुरू करणार व विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून प्लेसमेंट उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

सदर कार्यक्रमात इलेक्ट्रिशियन ,फिटर व वेल्डर विभागातून प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
प्रथम वर्ष इलेक्ट्रिशन विभागातून १)माडे विशाल कैलास 84%, २)हरीश ज्ञानेश्वर पाटील 79 % ,३) सचिन बिलाजी बोरसे 76.17% . फीटर विभागातून १) चेतन विठ्ठल पाटील 83% ,२) खुशाल उमेश पाटील 79.67% , २) योगेश कृष्णा महाजन 79.67% , ३) निखिल प्रकाश कोळी 79% . वेल्डर विभागातून १) आकाश भगवान कोळी 78.67% २)रमेश किरट बारेला 77.50%,३) महेंद्र सुरेश चेंबर 77%, . इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षातून १) करण संजय माडे ८२% २)कल्पेश शरद धनगर 77.67%, २) कुलदीप सुरेश पालके 77.67% ३) वैभव विनोद गंभीर 77% . फिटर द्वितीय वर्षातून १) समीर चंद्रकांत कोष्टी 78.33% ,२) विशाल अविनाश पाटील 77.50%,३) चेतन जगदीश पाटील 75.50%. तसेच चिरंजीव भावेश प्रकाश चव्हाण 2019 चा विद्यार्थी याचे रेल्वे डी ग्रुप मध्ये सिलेक्शन झाले म्हणून त्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी आयटी विभागातील सर्व निर्देशकांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआय चे समन्वयक डी.जी. सोमानी सर तर पाहुण्यांच्या परिचय व्हि. जी दारुंटे सर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन पि.के.चौधरी यांनी केले.
