चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचारा मुळे बोगस रुग्णाचा बोलबाला # बोगस रुग्णांमुळे औषधांचा तुटवडा? # वैद्यकिय प्रशासन हतबल…
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसापूर्वी शासन आदेशानुसार कोणताही गरीब रुग्ण उपचारपासून वंचित राहू नये या करता मोफत रुग्ण सेवा रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे यामुळे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात अचानक गरजू रुग्णांन सह बोगस रुग्ण सुद्धा गर्दी करताना दिसून आले.

पाहिले नाममात्र 10 रुपये देऊन केस पेपर मिळत होते त्या वेळी सरासरी 350 रुग्ण ओ पी.डी.साठी येत असे तीच संख्या मोफत उपचाराचा आदेशा नंतर 800 ते 900पर्यंत पोहचली आहे.त्यात मोफत केस पेपर मिळत असल्यामुळे एक रुग्ण घरातील बाकी सदस्याचा नावाने पेपर घेऊन औषधी गोळा करून घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या मुळे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने सांगण्यात आले. त्यातील काही बोगस रुग्ण हे रोज पेपर काढून औषध घेऊन काही मेडिकल वर विक्री तर होत नाही ना ? उपजिल्हा रुग्णालयात कुटलीही पळताळणी न करता केस पेपर वाटण्यात येत आहे जे रुग्ण बाहेर गावी आहेत अश्या रुग्णाचा नावाने सुद्धा केस पेपर घेऊन जाणारे निदर्शनास आले.

या विषयी उपजिल्हा येथील प्रभारी वैद्यकिय अधीक्षक सुरेश पाटील यांना विचारणा केली असता विषय गंभीर असल्याचे संगतीले उप जिल्हा रुग्णालयातील औषध बाहेर विक्री होत असल्याचे कानावर आले आहे त्या करता लवकरच मीटिंग घेऊन उपाय योजना करू बोगस रुग्णाचा वाढत्या संख्यमुळे रुग्णांना सेवा पुरवणीत अडचण येत असल्याचे यांनी सांगितले पहिलेच चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास टक्के डॉक्टर संख्या कमी असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले .

कुटलीही शहा निशा न करता केस पेपर सहज मिळत असल्यामुळे गुन्हेगारांना सोईचे होणार आहे बाहेरगावी असलेल्या नागरिकांचे केस पेपर घेऊन त्यांनी काही गुन्हा केल्यास केस पेपर दाखऊन पोलिसांची दिशाभूल करू शकता असे घडल्यास त्याला जबाबदार कोण ?हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तरी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे
