महाराष्ट्र 9

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडे चार फूटची रायफल जप्त# चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

[espro-slider id=13780]

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडे फूटची रायफल जप्त

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी)—


तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे बधुगाव जवळ गावठी बनावटीची रायफल आरोपितांकडून मिळून आली.
सविस्तर असे की, दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणारे पोलिसांना ह्या दोघावर संशय आल्याने ह्यांना थांबविण्यासाठी हटकले असता. मोटारसायकलच्या मागच्या सिटवर बसलेला आरोपी पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा घेवुन आरोपी कांतीलाल दुरसिंग पावरा रा.महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि.धुळे याने पळ काढला.

सदरील गुन्ह्यातील दुसरा आरोपी रमेश मालसिंग पावरा वय ३३ रा महादेव दोंदवाडे ता शिरपुर जि धुळे त्याचा जवळ गावठी बनावटीची साडेचार फुटाची रायफल हे प्राणघातक अग्नीशस्र आहे हे माहीत असताना देखील विना परवाना स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगतांना मिळून आले.

पोहेकी राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादि वरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी कडून ८०,०००/- रुपयांची एक गावठी बनावटीचा साडे चार फुट रायफलला ड्रेगर लोखंडी, रायफल थे बट लाकडी आडीजात लाकडीचे व पितळी पट्ट्या लावलेले मिळुन आले तसेच ६०,०००/- किमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली बिना नंबर प्लेट असलेली अशी एकूण
१,४०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला डी. वाय.एस.पी. ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शिंगाणे, व राकेश पाटील हे तपास करीत आहे. आरोपीने ही रायफल जवळपास 18 गुन्ह्यात वापरलेली आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. व एक आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]