विकासाच्या अवस्था व बदलत्या काळामुळे माणुसकी संपून हरवत चाललाय संवाद– श्री भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा(प्रताप विद्या मंदिरात आयोजित महसूल सप्ताह अंतर्गत युवा संवादात प्रतिपादन… )
चोपडा (प्रतिनिधी )दि.2 ऑगस्ट 2023 रोजी चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिरात महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांच्या पत्रकांन्वये महसूल सप्ताह अंतर्गत युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्य संवादक म्हणून भूमिका बजावताना उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणीचे महत्त्व, मतदानाविषयी जनजागृती, तसेच त्यांच्या मनातील शंका निरसण, पालक व पाल्य यांच्यातील दुरावलेला संवाद, बदलता काळ- बदलत्या व्यवस्था व माणुसकी, ईच्छा- आकांक्षा याविषयी बोलताना आपण माणुसकी जपा व एकमेकांशी संवाद करा अनेक आजारांवरील उपाय म्हणजेच सुसंवाद होय या शब्दात भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज तसेच मार्गदर्शन एकनाथ बंगाळे प्रांताधिकारी चोपडा, सचिन बंबाडे नायब तहसीलदार चोपडा, अविनाश पाटील गटशिक्षणाधिकारी चोपडा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या युवा संवाद कार्यक्रमांतर्गत जातीचे ,उत्पन्नाचे व वय अधिवासाचे प्रमाणपत्र वाटप तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थी यांचा गुणगौरव , उपक्रमशील शिक्षकांचे अभिनंदन ही करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मंदिराचे शिक्षक व निवडणूक साक्षरता मंचाचे नोडल अधिकारी व्ही ए गोसावी यांनी केले.निवडणूक आयोगाची स्थापना, कार्य ,उद्दिष्टे व सर्वसामान्य मतदार म्हणून आपली भूमिका याविषयी मत मांडले.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, प्रतिमा पूजनाने करण्यात आली.


उपस्थित मान्यवरांचे स्वागत सर्व निवडणूक साक्षरता मंचाच्या सदस्यांद्वारे व विद्यालयाच्या मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी 1 जानेवारी 2024 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत अशा विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करून घेण्यात आली. शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट असा योजना कार्यक्रम सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत शासकीय सोयी सुविधा पुरवण्याचा मूलमंत्र खऱ्या अर्थाने साध्य करण्यासाठी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, निवडणुकीचे महत्त्व ,कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू आणि जनमताची कदर करणाऱ्या प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सदृढ लोकशाही घडवते व ती तरुणांच्या प्रेरणेनेच घडते. यासाठी मी एक तरुण व जागरूक मतदार म्हणून माझी भूमिका काय असावी याविषयी सखोल मार्गदर्शन एकनाथ बंगाळे प्रांताधिकारी यांनी केले. विद्यालयातून निवडणूक साक्षरता प्रचारक म्हणून चि.गणेश दीपक महाजन याची निवड करण्यात आली तसेच दिव्या पाटील , पद्मजा पाटील, घनश्याम कोळी, रोशनी पाटील या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. प्रा.डी.एस.पाटील. प्रा.डी.डी.देशमुख श्री.एस व्ही करमरकर, श्रीमती गजाला अन्सारी या उपक्रमशील शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रशाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, उपप्राचार्य श्री जे एस शेलार, पर्यवेक्षिका श्रीमती माधुरी पाटील पर्यवेक्षक पी डी पाटील ,एस एस पाटील सर्व शिक्षक बंधू -भगिनी लेखनिक, कर्मचारी बंधू, तहसील कार्यालयाचे सर्व सन्माननीय कर्मचारी बंधू आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुबक फलक लेखन पंकज नागपुरे, कमलेश गायकवाड ,ईशस्तवन पी बी.कोळी व गानवृंद ,आभार प्रदर्शन प्रा.शेलार सर , तर सूत्रसंचालन प्रा.एम पी पाटील यांनी केले……
