चोपडा तालुक्यातील कर्जाने आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा जेवणात आढळले अळ्या # समस्याचे निवारण न झाल्यास विद्यार्थी आंदोलन करणार#संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र संस्था अध्यक्ष ऍड संदीप पाटील

चोपडा तालुक्यातील , शरदचंद्रिका पाटील पो.बे. शासकीय आदिवासी आश्रम शाळा कर्जाने येथील आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होत असलेल्या त्रासाचा पाढा विद्यार्थ्यांनी चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदनात दिले.त्यात विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे समस्या मांडल्या.जेवणामध्ये सतत एकच मेनू असतो,आणि त्यामध्ये अळी पडलेले जेवण विद्यार्थ्यांना देत असतात, जेवणाची वेळी मुले जेवण वाढतात, कर्मचारी वाढत नाही. व जेवनाची मेनू कार्ड लावलेले नाही. विशेष म्हणजे मुदत संपलेले आहार अन्न मुलांना शिजवून देतात.वसतिगृहातील शौचालयची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था नाही.

मुख्याध्यापक शाळेवर वेळेवर हजर राहत नाही मुला-मुलीचे वसतिगृह येथील शौचालयची साफ सफाई मुलीकडून केली जाते; बायोलोजी शिक्षक नाही,मुलींचे वसतिगृह येथील गृहपाल श्रीमती हर्षली प्रवीण पाटील सतत गैरहजर असतात. मुलीना सतत त्रास देत असतात
याबद्दल मुख्याध्यापक. सावकारे सर यांना विध्यार्थी वारंवार तक्रार करून सुद्धा लक्ष देत नाही. असे विध्यार्थीनि विद्यार्थ्यां यांचे म्हणणे आहे. व दिनांक: रोजी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील म्हणून आले असता वरील समस्याचे लेखी स्वरुपात विषय मांडण्यात आले सदर विषयाचे समस्या सोडविण्यात यावे व येथील मुख्याध्यापक गृहपाल यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात यावे व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यात यावे. जर वरील विषयाचे समस्या सोडविली नाही तर आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा चोपडा च्या वतीने दिनांक ०७/०८/२०२३ रोजी आम्ही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसू, हीच नम्र विनंती.


या विषयी संस्थेचे अध्यक्ष ऍड संदीप पाटील यांच्याशी फोन संपर्क केला असता शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा वाद असल्याचे सांगितले जेवण विद्यार्थ्यांना लेट मिळते ही बाब माझा लक्षात आली असून या प्रकरणी स्टाफ ला कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे विद्यार्थ्यांना जेवण हे चांगल्या प्रतीचे दिले जात आहे सोशल मीडियावर जे जेवणात अळीचे फोटो व्हायरल करण्यात आले आहे ते शाळेचे नसून बाहेरचा कोणी व्यक्ती संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे लवकरच त्याव्यक्तीचा शोध घेऊन सत्य समोर आणू अशी माहिती अध्यक्षांनी दिली.

