मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीकडुन चोरीच्या चार मोटर सायकल जप्त.# चोपडा शहर पोलिसांची कारवाही…
चोपडा (प्रतिनिधी)संजय नाना देवरे, रा. वडजाई, ता. जि. धुळे यांची दिनांक- 12/01/2023 रोजी रात्री 8ते 9वा.चे दरम्यान चोपडा शहरातील लोहाना पेट्रोलपंपाच्या मागील भागातुन एच.एफ. डिलक्स मोटार सायकल कोतीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने पोलीस स्टेशन चोपडा शहर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ शेषराव तोरे यांनी सदर गुन्ह्यात आरोपी पवन संजय साळुंखे, रा. सुंदरगढी चोपडा तसेच अमोल राजेंद्र अहिरे, रा. खडगांव ता. चोपडा यांना अटक करुन तसेच विधी संघर्षीत बालक सागर प्रल्हाद अहिरे, रा. खडगांव ता. चोपडा यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल एम.एच.18.ए.एम., 8666 एच.एफ डिलक्स मोटार सायकल तसेच, या व्यतिरीक्त एम.एच. बीबी 5004 हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल ,एम.पी.10 एन.ए.3444 एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल, विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची एच.एफ डिलक्स मोटार सायकल अशा एकुण अंदाजे 1,लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

वरील गुन्ह्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांना अटक करुन त्यांना आज मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक 31/07/2023 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर आरोपीतांनी या व्यतिरीक्त अजुन गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आरोपीतांकडुन आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व यापुर्वी घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक जळगांव यांनी वेळोवेळी गुन्हे बैठकी दरम्यान तसेच दैनंदिन आदेश देत असतात त्यांच्या आदेशान्वये व मा. रमेश चोपडे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव यांच्या तसेच, मा.कृषीकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. के. के. पाटील साहेब, (स.पो.नि.अजित सावळे, स.पो.नि.संतोष चव्हाण, पो.उप नि. घनशाम तांबे सहा.फौ.सुनिल पाटील, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक विसावे, पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना हेमंत कोळी, पोना प्रमोद पाटील, पोना मधुकर पवार, पोना संदिप भोई, पोना किरण गाडीलोहार, पोना ईश्वर धनगर, पोकॉ मिलींद सपकाळे, पोकॉ प्रकाश मथुरे, पोकॉ रविंद्र पाटील, पोकॉ प्रमोद पवार, पोकॉ विजय बच्छाव, पोकॉ सुमेर वाघरे, पोकों शुभम पाटील, पोकॉ आत्माराम अहिरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
