महाराष्ट्र 9

जिल्ह्यातील पहिली महिला कोरोना मुक्त,अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील महिलेने केली कोरोना वर मात

[espro-slider id=13780]

कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेली अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील कोरोना पॉझिटीव्ह महिलेने या विषाणूवर मात केली असून तिचा ताजा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यामुळे ही महिला कोरोनामुक्त होणारी जिल्ह्यातील दुसरी रुग्ण ठरली आहे.

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६० वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. अमळनेर तालुक्यातील ही पहिली रुग्ण होती. यानंतर अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या महिलेवर जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते.१४ दिवसांचे उपचार केल्यानंतर या महिलेची पुन्हा चाचणी घेण्यात आली असता तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आला. यामुळे आता ही महिला कोरोनामुक्त झालेली असून लवकरच तिची कोविड रूग्णालयातून मुक्तता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]