हातेड आरोग्य केंद्राचा दुहेरी गौरव
मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णवाहिका,तालुकास्तरावर सत्कार
चोपडा – तालुक्यातील हातेड बु॥ येथील जि.प.आरोग्य केंद्राचा दुहेरी गौरव झाला आहे.जळगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी या दवाखान्यास नविन रुग्णवाहिका प्रदान केली.

तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दीष्ठ वेळेत पूर्ण केल्याबद्दल मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा.विवेक जैस्वाल यांना आरोग्य विभागाच्या तालुकास्तरावरील बैठकित तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा. प्रदीप लासूरकर यांनी गौरविले.सोबतच उद्दीष्ठपुर्ती सहाय्य केलेल्या सर्वच कर्मचा-यांचा डॅा.लासूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये डॅा.नितिन अहिरे,डॅा.अक्षय पाटील,डॅा.अर्चना पाटील,डॅा.दिनेश निळे,डॅा.विनायक पाटील,आरोग्य सहाय्यक पी.के.पाटील,एम.के.तारु,आरोग्य साहिय्यीका अरूणा सुर्यवंशी,आरोग्य सेविका सुवर्णा धनगर,मनीषा सैंदाणे,व्ही.आर.खान,निकिता सोनवणे,जागृती राजपुत,आर.डी.पाटील,महेश सोनवणे,सुरेश पाटील,परदेशी,यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॅा.राहुल पाटील,डॅा.मोहसिन पटेल,डॅा.राहुल पाटील,डॅा.विक्रांत मोरे,डॅा.अश्विनी राजपुत,फार्मासिस्ट परेश पाटील,वाहक विनोद वाघ,लॅब असिंस्टंट नरेंद्र सुर्यवंशी,परिचर सिंधूबाई कोळी,संजय पाटील,ईश्वर पाटील,संजय वंडर आदि अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
