महाराष्ट्र 9

प्रताप विद्या मंदिर ,चोपडा येथील विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश

[espro-slider id=13780]


प्रताप विद्या मंदिर ,चोपडा येथील विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश

चोपडा (प्रतिनिधी)2021/23 रंगोत्सव सेलिब्रेशन ,मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रताप विद्या मंदिरातून 98 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. त्या 98 विजयी स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यातील 38 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नऊ स्पर्धांमध्ये भाग घेतला होता .त्यात 38 ही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली .त्याचा आज शाळेत बक्षीस समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा झाला .

शाळेतून 2 विद्यार्थ्यांना रंगभरण ,स्केचिंग यात जगभरातून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले व एका विद्यार्थ्यास रंगभरण स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तसेच 6 विद्यार्थ्यांना स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड ट्रॉफी, 22 विद्यार्थ्यांना इमर्जिंग युथ आर्टिस्ट अवॉर्ड मेडल व सात विद्यार्थ्यांना टूरिस्टर कंपनीची स्कूल बॅग कन्सोल्युशन अवॉर्ड म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात आले .या स्पर्धेत भारतासह एकूण पंधरा देशांनी सहभाग नोंदविला होता.



बक्षीस वितरणाच्या प्रसंगी रंगोत्सव सेलिब्रेशनचे संस्थापक संग्राम दाते सर, प्रताप विद्या मंदिराच्या सचिव माधुरीताई मयूर, उपाध्यक्ष . विश्वनाथ अग्रवाल काका, ललित कला केंद्र, चोपडा माजी प्राचार्य . राजेंद्र महाजन सर, चोपडा कलाध्यापक संघाचे सचिव अर्जुन कोळी सर, सी.बी .निकुंभ विद्यालय घोडगाव येथील पर्यवेक्षक . वसंत नागपुरे सर, प्रताप विद्या मंदिराचे माजी संगीत शिक्षक आदरणीय .वसंत भाई मयूर सर, प्रशालेचे मुख्याध्यापक.प्रशांत गुजराथी सर, उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे सर व . जोगेश शेलार सर, पर्यवेक्षक मा.माधुरी पाटील मॅडम पी. डी .पाटील सर आप्पा पाटील सर व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते 38 विद्यार्थ्यांचा आकर्षक प्रमाणपत्र,ट्रॉफी ,मेडल्स, स्कूल बॅग ,स्मार्टवॉच, स्मार्ट कॅमेरा आणि स्मार्ट वॉच देऊन गौरव करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे माजी संगीत शिक्षक आदरणीय वसंत भाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई .तर्फे थोर संगीत तज्ञ स्वर्गीय विष्णू दिगंबर पलूसकर कलागौरव हा अतिशय मानाचा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सरस्वतीची सुंदर आकर्षक मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला व शाळेचा माजी विद्यार्थी चि. हेमांग सुनील गुजराथी अखिल भारतीय गांधर्व विद्यालयातून महाराष्ट्रात तबला विशारद परीक्षेत प्रथम आला त्याबद्दल त्याचाही सत्कार माधुरी ताईंच्या हस्ते शाल श्रीफळ व सरस्वती देवीची मूर्ती देऊन करण्यात आला. गुरु शिष्य परंपरेचे मूर्तीमंत उदाहरणाचा योग आज शाळेत घडला होता.

प्रसंगी संग्राम दाते सर व संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले याप्रसंगी रंगोत्सव स्पर्धेत विजयी विद्यार्थी व स्कॉलरशिप व एन एम एम एस परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. प्रसंगी सुरुवातीस .पी. बी. को कोळी सर व त्यांचा संगीत समूहाने सुंदर असे सरस्वती मातेचे इशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन ए . एन .भट सर यांनी केले व आभार शाळेचे पर्यवेक्षक पी. डी. पाटील सर यांनी केले. फलक लेखन कलाशिक्षक .कमलेश गायकवाड सर यांनी केले.या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. पंकज नागपुरे सर व कमलेश गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले.

आमच्या सर्वांसाठी निश्चितच हा आनंदाचा क्षण आहे.
विजयी विद्यार्थ्यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.शैलाबेन मयूर, चेअरमन.श्री राजाई मयूर. उपाध्यक्ष मा.विश्वनाथ काका अग्रवाल सचिव मा. माधुरीताई मयूर संस्थेचे सभासद चंद्रहास भाई गुजराथी, भूपेंद्र भाई गुजराथी ,जैन काका यांनी अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी लिपिक व शिपाई बंधू पालक वर्ग यावेळी हजर होता. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिपाई बंधूंची खूप मदत झाली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. संघटने शिवाय कुठलेच काम पूर्ण होत नाही म्हणून संघटना हे सूत्र बनावे .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]